खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून पंढरीत एकाची आत्महत्या ?

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर शहरातील खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून एका ने आत्महत्या केल्याची घटना पंढरीत घडली असून या संदर्भात अद्याप शहर पोलिसात फिर्याद दाखल झालेली नाही. मात्र भाजप युवा मोर्चाचे माजी पदाधिकाऱ्याविरोधात मृताच्या नातेवाईकांनी धमकवल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. अशोल नवले असे आत्महत्या केलेल्या नागरिकाचे नाव आहे.

पंढरपूर शहरात खाजगी सावकारीनेसर्वसामान्य नागरिकांना हैराण करून सोडले आहे. अनेकांनी खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून शहर सोडले आहे. तर अनेक जण सावकाराच्या दहशतीखाली जगत आहेत. सावकाराच्या दहशतीमुळे कुणीही तक्रार करण्यास पुढे येत नाही.

नुकतेच भाजप युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष याच्या विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर त्याच्या विरोधात शहर पोलीस आणि सहायक निबंधक यांनी कारवाई केली होती. या दरम्यान अनेक कागदपत्रे, धनादेश, रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली होती.

त्यानंतर संबंधित पदाधिकारी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अशोक नवले यांना दमदाटी केली होती. असा आरोप मयत नवले यांच्या पत्नीने केला आहे. या सगळ्या दहशतीला कंटाळून अशोक नवले यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. असा आरोप मयत नवले यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात अद्यापही फिर्याद दाखल झालेली नव्हती.

Leave a Reply

error: Content is protected !!