पहिल्या पत्नीस ठार मारले ; १४ वर्षे जेल भोगून आला : दुसऱ्या पत्नीस ठार मारण्याचा प्रयत्न केला

पुन्हा ५ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा

पंढरपूर : eagle eye news

२००१ साली पहिल्या पत्नीचा खून केला. त्या खून प्रकरणात जन्मठेप झाली, १४ वर्षे शिक्षा भोगून आला. मात्र पहिल्या पत्नीच्या खून प्रकरणी दुसऱ्या पत्नीने आपल्या विरोधात साक्ष दिल्याचा राग मनात धरून जेलमधून सुटून आल्यानंतर दुसऱ्या पत्नीलाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातही आरोपी पतीस पंढरपूर न्यायालयाने ५ वर्षे पुन्हा सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. धोंडीराम शेळके (रा. तिसंगी , ता. पंढरपूर ) असे आरोपी पतीचे नाव आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तिसंगी ( ता. पंढरपूर ) येथील आरोपी धोंडीराम भिमराव शेळके याने पहिली पत्नी छबाबाई हिचा दिनांक १६ जुलै २००१ रोजी खुन केला होता. व त्या प्रकरणात त्याची दुसरी पत्नी रंजना हिने आरोपी असलेल्या नवऱ्यविरूध्द साक्ष दिलेली होती. त्यामुळे आरोपीस जन्मठेपेची शिक्षा झालेली होती. ती १४ वर्षांची शिक्षा भोगुन आरोपी येरवडा जेलमधुन सुटून आलेला होता आणि तिसंगी (ता. पंढरपूर ) येथे मुलाकडे राहत होता.
पत्नी रंजना हिने आपल्याविरुद्ध साक्ष दिल्यामुळे १४ वर्षाची शिक्षा झाली, याचा राग मनात होता.

रंजना हिच्यामुळे मला १४ वर्ष जेलमध्ये बसावे लागले असे म्हणत होता. त्याच रागातून दिनांक १९ मार्च २०२१ रोजी सकाळी 11 वाजता रंजना ही घरात असताना आरोपीने उसतोडीच्या कोयत्याने तिच्या डोक्यावर, डोळयाजवळ, डोक्याच्या पाठीमागे वार करून तिला गंभीर जखमी केले. याबाबत फिर्यादी सत्यवान शेळके यांनी आरोपीविरूध्द पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली होती.

त्याप्रमाणे आरोपीविरूध्द गुन्हा दाखल झालेला होता. त्यामध्ये दुसरी पत्नी रंजना हिने साक्ष दिल्यामुळे आरोपीस जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याचा राग मनात धरून रंजना हिच्यावर कोयत्याने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत आरोपीस दोषी धरून ५ वर्ष सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा पंढरपूर अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश १ श्री एम बी लंबे यांनी सुनावली. एकंदरीत पुरावा व दोषारोपपत्रातील कागदपत्रे याचे अवलोकन करून आरोपीस ५ वर्ष सक्तमजुरी व ५ हजार रूपये दंड व भादवि ५०४ करीता १ हजार रूपये दंड, भादवि ५०६ करीता २ हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. यात सरकारपक्षातर्फे अॅड. सारंग वांगीकर यांनी काम पाहिले.

Leave a Reply

error: Content is protected !!