टीम : ईगल आय मीडिया
चोरी प्रकरणात जप्त केलेल्या पोलीस ठाण्याच्या आवारातील 26 लाख रुपयांच्या विविध वस्तू विक्री प्रकरणी एका महिला कॉन्स्टेबल ला अटक करण्यात आली आहे. मंगल गायकवाड असे त्या महिला कॉन्स्टेबल चे नाव असून तिला निलंबित करण्यात आले आहे.
वसई पोलीस ठाण्यात चोरीच्या प्रकरणात जप्त केलेल्या चोरीच्या वस्तूंचा प्रभारी कॉन्स्टेबल मंगल गायकवाड याने एका भंगार व्यापाऱ्याच्या मदतीने 26 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक कल्याण कर्पे यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यातील वसई पोलीस ठाण्यात 6 वर्षांपासून चोरीच्या प्रकरणांमध्ये जप्त केलेल्या 26 लाख रुपयांच्या विविध वस्तू महिला पोलीस कॉन्स्टेबलने विकल्या आहेत.पोलीस ठाण्याचे ऑडिट करताना हा प्रकार लक्षात आले आहे.
या गैरव्यवहारप्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल मंगल गायकवाडला अटक करण्यात आली आहे, असे एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. चौकशीअंती गायकवाड यांना निलंबित करण्यात आले असून त्यांना बुधवारी अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.