रक्षाबंधन करून सासरी येताच तिने घेतला गळफास

जैनवाडी येथे सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पंढरपूर : ईगल आय मीडिया

सासरचे लोक छळ करतात म्हणून माहेरी राहणाऱ्या विवाहित बहिणीला परत पाठवले, मात्र सासरी परत आलेल्या विवाहितेने दुसऱ्याच दिवशी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना जैनवाडी ( ता. पंढरपूर ) येथे घडली आहे. पूजा महेश लिंगडे ( वय 21 वर्षे ) असे त्या अभागी विवाहितेचे नाव आहे.

याबाबत पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे ही विवाहित रक्षाबंधन साठी माहेरी कासेगाव ला आली होती. तिला रविवारीच संध्याकाळी सासरी  पाठवण्यात आले होते आणि दुसऱ्या दिवशी आत्महत्येचा निरोप आल्याचे पुज्याचा भाऊ चैतन्य ने सांगितले.

                      याबाबत विवाहित पूजा भाऊ चैतन्य राजू भोसले यांच्या तक्रारीवरून पती महेश   महादेव लिंगडे, सासू   जया महादेव लिंगडे, सासरे महादेव ज्ञानू लिंगडे, दीर प्रशांत महादेव लिंगडे ( रा सर्वजण जैनवडी, ता. पंढरपुर ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पूजा  हीच विवाह तीन वर्षांपूर्वी जैनवाडी येथील महेश लिंगडे यांच्याशी झाला होता. तेव्हापासून तिला तुला स्वयंपाक येत नाही, तुझ्या आईवडिलांनी माझ्या  मुलाचा लग्नात मानपान केला नाही म्हणून तिला वारंवार त्रास मारहाण केली जात होती.  या त्रासाचा कारणावरून विवाहित पूजा मागील काही दिवसांपासून कासेगाव (ता पंढरपुर ) येथे आईवडिलांकडे रहात होती. परत सासरी नांदायला जायला ही तयार नव्हती मात्र 9 ऑगस्ट रोजी पूजाच्या पतीचा फोन आला. पूजाला आजच्या आज पाठवा नाहीतर परत नंदवणार नाही.त्यानंतर तक्रारदार भाऊ चैतन्य, आई, व मामा दत्तात्रय मोरे यांनी त्याच दिवशी संध्याकळी पूजा आणि तिच्या लहान मुलास सासरी नेऊन सोडले होते.

त्याच दिवशी पुन्हा संध्याकळी मारहाण झाल्याचा पुजा हिचा माहेरच्या लोकांना फोन आला होता.  मात्र सकाळी बघू म्हणून सासरच्या लोकांनी तिची समजूत काढली होती. मात्र दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता  विवाहितेचा पती महेश ने पूजा ने गळफास घेतल्याची बातमी सासरच्या लोकांनी दिली होती. आशी फिर्याद विवाहितेचा भाऊ चैतन्य भोसले याने पंढरपुर ग्रामीण पोलिसात दिली आहे. यानंतर पोलिसांनी ही आमच्या मागणीप्रमाणे तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा आरोप तक्रारदार चैतन्य भोसले व नातेवाईकांनी केला आहे.  पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे करीत आहेत.

2 thoughts on “रक्षाबंधन करून सासरी येताच तिने घेतला गळफास

  1. चूक कोणाचीही असो पण आत्महत्या हा पर्याय नाही, याचा नाहक त्रास दोन्ही कुटुंबातील निष्पाप लोकांना भोगावा लागतो..;

Leave a Reply

error: Content is protected !!