50 मोबाईल आणि चोर ही पकडला

एका मोबाईलचा शोध घेताना 50 सापडले : पंढरपूर शहर पोलिसांची कामगिरी

पंढरपूर : ईगल आय न्यूज

चोरीस गेलेल्या एक मोबाईल चा तपास करीत असताना पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना 3 लाख 89 हजार रुपये किंमतीचे 50 मोबाईल सापडले. या प्रकरणी सर्व मोबाईल आणि ते चोरणारा चोर सापडले आहेत.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात मोबाईल आणि सिमकार्ड चोरीची फिर्याद दाखल होती. त्या मोबाईल चा तपास करीत असताना वाढेगाव ता. सांगोला येथील आरोपी सीताराम दामोदर जाधव याच्याकडे तो मोबाईल सापडला. त्या आरोपीने आपण हा मोबाईल एका इसमाकडून खरेदी केल्याचे सांगितले.


त्यानुसार पंढरपूर शहर पोलिसांनी पारे ता. सांगोला येथे जाऊन आरोपीकडून 3 लाख 89 हजार रुपये किंमतीचे चोरीचे 50 मोबाईल हँडसेट जप्त केले आहेत. त्याचबरोबर या आरोपीस ही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सी व्ही केंद्रे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!