सोलापुरात 6 मोबाईल शॉपी लुटल्या : cctv ने केले कैद
सोलापूर : ईगल आय मीडिया
शुक्रवारी मध्यरात्री सोलापूर शहरातील विविध भागात फिरून चोरट्याच्या टोळीने 200 मोबाईल, काही लॅपटॉप असा सुमारे 50 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लुटला आहे. विशेष म्हणजे कोरोनाची भीती असलेले चोरटे चक्क पी पी ई किट घालून आले होते.
याबाबत चे सविस्तर वृत्त असे की शहरातील जुना एम्प्लॉयमेंट चौक, नवी पेठ, मार्केट येथे ही दोन दुकाने फोडली आहेत. दर्शन हाईट्स मधील गायत्री कम्प्युटर येते दुकानाचे शटर उचकटून एक लॅपटॉप चोरट्याने पळून गेला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी याठिकाणी येऊन पाहणी केली
जुना एम्प्लॉयमेंट चौकातील महेश चिंचोली यांचे ज्योती टेलिकॉम आणि जय सेल्स ही दुकाने शटर्स उचकटून फोडली आणि आतील 50 पेक्षा जास्त मोबाईल चोरले आहेत. या दुकानात 10 हजार ते 60 हजार रुपये किमतीचे मोबाईल आहेत.
सोलापूर शहरातील पाच मोबाईलचे दुकान शुक्रवारी रात्री फोडली आहे, मार्केट यार्ड या भागातील ही दुकाने शुक्रवारी मध्य रात्री दीड वाजल्यापासून ते पहाटे अडीच वाजेपर्यंत 4 ते 5 जणांचा टोळीने या चोऱ्या केलेल्या आहेत. मार्केट यार्डच्यापाठीमागे 56 नंबर चा गाळा येथे मोबाइल चे दुकान, शिंदे चौक येथील मोबाईल बोळातील मोबाईल दुकानात चोरट्यानी हात साफ केले आहेत. चोरट्याच्या एका टोळीने एकापाठोपाठ एक फोडली आहेत, जवळपास दोनशे मोबाईल याची किंमत पन्नास लाखाच्या जवळपास असल्याची प्रथमिक माहिती आहे. पी पी ई किट घालून आलेले।चोरटे cctv कॅमेऱ्यात टिपले गेले आहेत. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यास मदत होणार आहे.चोरीस गेले आहेत सी सी टीव्ही मध्ये काही ठिकाणी आणि ही चोरी चित्रित झाली आहे.
बोरामनी नाका परिसरातील युनिक एंटरप्राइजेस, अर्ध्या तासाने दक्षिण कसब्यातील बालाजी दत्त मंदिराजवळ गायत्री कॉम्प्युटर्स हे दुकान फोडले.यातील एक लॅपटॉप आणि रोख 60 हजार रुपये लंपास केले. त्यानंतर चौपाड विट्ठल मंदिराजवळ अक्षय एंटरप्राइजेस येथील 40।मोबाईल चोरले. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास जुना एम्प्लॉयमेंट चौकातील ज्योती टेलिकॉम आणि जय सेल सेल्स ही दोन दुकाने शटर उचकटून फोडली आणि आतील 40 ते 50 मोबाईल पळवले. त्यानंतर विजापूर रोडवरील एस. जी सेल्स हे लॅपटॉप आणि मोबाईल दुकान फोडले, यातील 30 ते 35 मोबाईल चोरीस गेले आहेत. ज्योती टेलिकॉम चे संचालक महेश चिंचोली म्हणाले की , त्यांच्या दुकानात 15 ते 60 हजार रुपये किमतीचे मोबाईल होते.