मोहोळ शहरात प्रेमी युगलांची आत्महत्या

मोहोळ : ईगल आय मीडिया
प्रेम संबंधातून १९ वर्षीय तरुण आणि त्याच्या अल्पवयीन प्रेयसीने एकाच स्कार्फने चिंचेच्या झाडाला गळफास घेतला. हि घटना आज बुधवार (दि. ६ जानेवारी ) रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बी.पी.एड. कॉलेज मोहोळ परिसरात उघडकीस आली. भूषण धनंजय पडवळकर ( वय १९ वर्षे, रा. देशमुख गल्ली, मोहोळ) आणि वैष्णवी नामदेव थोरे (वय, १७ वर्षे, रा. स्टेशन रोड, मोहोळ) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगलांची नावे आहेत. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसांत करण्यात आली आहे.


या बाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नागनाथ गल्ली मोहोळ येथील भूषण धनंजय पडवळकर आणि स्टेशन रोड मोहोळ येथील वैष्णवी नामदेव थोरे यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेऊन लग्न करुन सुखी संसाराची स्वप्ने पाहिली होती. मात्र दोघेही भिन्न जातीचे असल्याने दोघांच्याही घरचे आपल्या या नात्याला स्विकारणार नाहीत असा त्यांचा समज झाला होता. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून दोघेही मानसिक तणावात वावरत होते.


बुधवार ६ जानेवारी रोजी सकाळी सव्वा दहा वाजता कटींग करुन येतो असे सांगून भूषण घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याने आपली प्रेमिका वैष्णवीची भेट घेऊन सोलापूर – पुणे महामार्गाच्या लगत असणारे बी.पी.एड. कॉलेज गाठले. या ठिकाणी त्यांनी एकत्र जगता येत नसल्याने एकत्र मरु तर शकतो असे मनाशी ठरवून चिंचेच्या एकाच स्कार्फने गळफास घेऊन प्रेमकहानीला पुर्णविराम दिला. दुपारी ३ वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली.


या प्रकरणी संजय विलास पडवळकर यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या माहितीवरुन अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक माने हे करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे मोहोळ शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!