लक्ष्मीटाकळीत किरकोळ वादातून खून

पंढरपूर : प्रतिनिधी

लक्ष्मीटाकळी (ता. पंढरपूर) येते एका महीलेला, तू ठेकेदाराची बायको असताना धुणेभांडी का करते असे म्हणाल्यावरून जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पतीचा चाकुने खून केल्याची घटना सोमवारी घडली होती. या प्रकरणी औंदुबर गाढवे (रा. टाकळीरोड, आण्णाभाऊ साठे शाळेच्या पाठीमागील बाजुस, लक्ष्मी टाकळी, ता. पंढरपूर) याला अटक करण्यात आली आहे.

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीनुसार, रुपाली सिध्देश्वर पवार (वय २८, रा. टाकळी रोड, देवकाते मळा, लक्ष्मी टाकळी, ता. पंढरपूर) यांना तु ठेकेदाराची बायको असताना धुणेभांडी का करते. व रस्त्यात दिसल्यावर गुरकुन का बघते असे औंदुबर गाढवे (रा. टाकळीरोड, आण्णाभाऊ साठे शाळेच्या पाठीमागील बाजुस, लक्ष्मी टाकळी, ता. पंढरपूर) हा म्हणाला होता. याचा जाब विचारण्यासाठी सिध्देशवर मछिचंद्र पवार (वय ३९, रा. टाकळीरोड, देवकाते मळा, लक्ष्मी टाकळी, ता. पंढरपूर) हे २८ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास गाढवे यांच्या घराकडे गेले. यावेळी गाढवे याने पवार बरोबर भांडण करुन त्यास चाकुने मारले व घटनास्थळा वरुन पळून गेला.

पवार याला उपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले हाते. परंतु पवार यांचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी सांगितले. तालुका पोलिसांनी शेतात लपून बसलेल्या गाढवे यांना शोधून काढले. या सर्व घटनेबाबत मयत सिध्देश्वर यांची पत्नी रुपाली यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोसई विक्रम वडणे करीत आहेत. गाढवे याला न्यायालयात हजर केले असता त्याचा न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!