धामणी येथे युवक कार्यकर्त्याचा खून

आंबेगाव तालुक्यात खळबळ : 2 आरोपी जेरबंद

टीम : ईगल आय मीडिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते सचिन राजाराम जाधव ( वय ४२ ) यांचा खून करून मृतदेह आणि गाडी जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार (ता २५ ) रात्री पोंदेवाडी (धामणी, ता. आंबेगाव, जि. पुणे ) इथं घडली. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे. या प्रकरणात मंचर पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद केलं आहे.

अधिक माहितीनुसार, धामणी इथल्या सचिन राजाराम जाधव मंगळवारी रात्री घरी न आल्यानं त्यांचा पुतण्या रोहन जाधव यांनी मंचर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. पोंदेवाडी – काठापुर रस्त्यालगत बुधवारी सकाळी नागरिकांना रक्ताचे शिंतोडे, चपलांचा जोड, कंगवा, आढळून आला स्थानिकांनी तत्काळ ही माहिती पोंदेवाडीचे सरपंच अनिल वाळुंज यांना दिली.।व्यवसायाच्या आर्थिक देवाण-घेवाणीत हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे.

याची माहिती मिळताच पोलिसांनी पोलीस अधीक्षक डा . अभिनव देशमुख, अप्पर अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय अधिकारी अनिल लंबाते, निरीक्षक सुधाकर कोरे यांनी घटनास्थळी पाहणी केली व तपास वेगाने फिरवला.

त्यांनी दोघांना ताब्यात घेतलं. मुख्य आरोपी बाळशिराम थिटे, विजय सूर्यवंशी अशी अटक केलेल्यांची नावं असून इतर दोन आरोपींना लवकरच ताब्यात घेऊ अशी माहिती पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितलं. तर अधिक तपास पोलीस सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!