विचित्र प्रकारच्या खुनामुळे उपराजधानी हादरली
टीम : ईगल आय मीडिया
पेन्शनच्या पैशावरून वाद आणि चरित्र्यावरून संशय यामुळे 60 वर्षीय इसमाचा त्याच्या 5 व्या बायकोने विचित्र पध्दतीने खून केला असून या घटनेमुळे नागपूर मध्ये खळबळ उडाली आहे. लक्ष्मण मलिक असे त्या मयताचे नाव असून पोलिसांनी त्याच्या पत्नीला अटक केली आहे.
दोन दिवसांपूर्वी नागपूरातील गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या रजत संकुलमध्ये एका वृद्ध इसमाचे हात-पाय खुर्चीला बांधल्यानंतर गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. मृतक लक्ष्मण मलिक यांचा खून त्यांच्या पाचव्या क्रमांकाच्या पत्नी केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. या प्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मयत लक्ष्मण मलिक हे एकटेच रजत संकुल येथील फ्लॅट मध्ये राहत होते. दरम्यान, 8 मार्चला संध्याकाळी त्यांची पाचव्या क्रमांकाची पत्नी त्यांना भेटण्यासाठी त्या फ्लॅटवर गेली. यावेळी स्वातीने सोशल मीडियावर उपलब्ध असलेले पॉर्न व्हिडीओ दाखवून त्यांचे हात आणि पाय खुर्चीला बांधले. त्यानंतर आणलेल्या धार-धार चाकूने लक्ष्मण मलिक यांचा गळा चिरून खून केला. त्यानंतर ती घटनास्थळावरून पसार झाली.
दुसऱ्या दिवशी लक्ष्मण मलिक यांचा खून झाल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला असता धक्कादायक बाबी समोर आल्या. मयत लक्ष्मण चे अनेक महिलांशी संबंध असल्याचा खुलासा झाला असून त्याने तब्बल पाच महिलांशी लग्न केल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली.
पोलिसांनी प्रत्येक महिलेला चौकशीसाठी बोलावले असता पाचव्या क्रमांकाच्या पत्नीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून पोलिसांचा तिच्यावरचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी स्वातीची कसून चौकशी केली. तेव्हा तिने लक्ष्मण मलिक यांचा खून केल्याची कबुली दिली.
लक्ष्मण मलिक यांच्या पाचव्या क्रमांकाच्या पत्नीला मलिककडून एक आठ वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, त्या महिलेकडे आणखी एक तीन महिन्यांचे बाळ असल्याने या दोघांमध्ये वाद सुरू होता. महिलेच्या म्हणण्यानुसार ते बाळ तिने नातेवाईकांकडून दत्तक घेतले होते. तर लक्षण मलिक याला तिचे इतर पुरुषासोबत संबंध असल्याचा संशय होता. शिवाय मृतक हा सेवानिवृत्त असल्याने त्याला मिळणाऱ्या पेन्शनच्या पैशावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यातून या महिलेने लक्ष्मण मलिक यांचा खून केल्याचा खुलासा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केला आहे.