माळशिरस : ईगल आय मीडिया
जनावरे बांधण्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना दसुर ( ता.माळशिरस, जि. सोलापूर ) येथे घडली आहे. याप्रकरणी 5 जनाविरोधात वेळापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अशोक मुकुंद शिंदे ( वय ७० वर्ष ) असे मयताचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रस्त्यावर गुरे बांधण्याच्या वादावरून मयत अशोक शिंदे व नाथ्याबा शंभर माने यांचा मुलगा प्रशांत नाथ्याबा माने, बजरंग नाथ्याबा माने, सौ.सिंधूबाई नाथ्याबा माने व मुलगी सोनाली नाथ्याबा माने यांनी, तुम्ही तुमचे जनवरे रस्त्यावर बांधत जाऊ नका, आमच्या मुलांना ये जा करताना जनावरं उठत नाहीत, या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी, लाथा भुक्याने खाली पाडून मारहाण केली, तसेच उचलून जोरात आपटल्याने अशोक शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान खारतोडे हे करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांनी वेळापूर पोलीस ठाण्यास भेट देऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच मयत कुटुंबीयांनी वेळापूर पोलीस ठाण्यासमोर जमाव करून जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मयत हलवणार नाही, अशी भुमिका शिंदे कुटुंबियांनी घेतली.
राहुल अशोक शिंदे ( वय वर्ष ३४ रा. दसुर, ता. माळशिरस जि. सोलापूर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाथ्याबा शंकर माने, प्रशांत नाथा बाबा माने, बजरंग नाथबाबा माने, सौ सिंधुबाई नाथबाबा माने, मुलगी सोनाली नाथबाबा माने ( सर्व रा. दसुर ता.माळशिरस ) यांच्यावर भा. द. वि. कलम ३०२,३२३,५०४,५०६,१४३,१३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.