कोरोनाच्या प्रसाराची शक्यता : पोलिस पायबंद घालतील का ?
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर शहरात 7 ते 8 ठिकाणी तसेच तालुक्यातील 12 ते 15 ठिकाणी करमणूक केंद्राच्या नावाखाली जुगाराचे अड्डे चालत असल्याचे दिसून येते. या ठिकाणी मोठ्या संख्येने जुगारी लोक जमत आहेत त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन पोलीस या जुगार अड्ड्यांना पाय बंद घालतील का असा सवाल उपस्थित होत आहे.
लक्ष्मी दहिवडी ( ता. मंगळवेढा ) येथील जुगार अड्ड्यावर येणाऱ्या 17 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कातील लोकांची आणखीन तपासणी झालेली नाही, त्यामुळे ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर अधिक माहिती घेतली असता, पंढरपूर तालुक्यातही अनेक ठिकाणी जुगार अड्डे चालत असल्याची माहिती आहे. पंढरपूर शहरात 7 ते 8 ठिकाणी जुगार चालत असल्याचे बोलले जाते. या ठिकाणी 50 ते 100 लोक जमतात असेही समजते. तर ग्रामीण भागात 12 ते 15 ठिकाणी जुगार चालत असून मोठ्या संख्येने जुगारी त्या ठिकाणी जमत असतात. त्यामुळे
पंढरपूर मध्ये संसर्ग वाढण्याची भोती आहे.
पोलिसांनी वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे. यापूर्वी जुगार चालविणारे आणि खेळणारे 4 ते 5 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत.