दुकान फोडले, अडीच लाखांची रोकड लंपास केली.
पंढरीत भरवस्तीतून पळवला गेलेला हाच ती टेम्पो
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर शहरात गेल्या काही दिवसांत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. 5 दिवसांतच एक माल वाहतूक टेम्पो पळवला, उपनगरातील एक दुकान फोडले तर एका दुकानदारांची अडीच लाख रुपयांची बॅग लंपास केली आहे. त्यामुळे नागरिकांतून चिंता व्यक्त होत आहे.
पंढरपूर शहरात गेल्या आठ दिवसात लहान मोठ्या चोऱ्यांचे सत्र सुरू झाले आहे. त्यापैकी किरकोळ स्वरूपात झालेल्या चोरीनंतर काही जणांनी तर पोलिसांना कळवलेही नाही. शहरातील भरवस्तीचा भाग म्हणून ओळखले जात असलेल्या पत्रकार नगर येथील भारत देसाई यांचा अशोक लेलॅंड कम्पणीचा ( mh13 – ax 7689 ) हा माल वाहतूक टेम्पो चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री पळवून नेला आहे. संत गाडगेबाबा चौकातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टेम्पो जाताना दिसून येतो आहे. त्याच नंबरचा आणि वर्णनाचा टेम्पो बुधवारी इचलकरंजी इथं दिसल्याचे समजते मात्र तरीही त्याचा शोध लागलेला नाही.
तसेच गुरुवार, शुक्रवार या दोन दिवसात सिंगन नगर येथील एक दुकान फोडून चोरी केली आहे तर राजाराम इंग्लिश स्कुल जवळ एका दुकानातून अडीच लाख रुपयांची बॅग चोरट्यांनी पळवली आहे. या घटना एका आठवड्यातील असून अशा चोऱ्याना पायबंद घालण्यासाठी पोलीस कोणती पावले उचलतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.