पंढरपूर : ईगल आय मीडिया
येथील महावीरनगर येथे पावणे सोळा लाखांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे चोरी कधी झाली हे घरमालकास माहीत नाही.शहर पोलीस या चोरीचा तपास करीत आहेत.
महावीरनगर येथील फर्निचरचे व्यापारी अजित फडे यांच्या घरातून ही चोरी झाली असून १ डिसेंबर ते १३ डिसेंबर या काळात सोने, चांदीचे दागिने आणि रोख रकमेची चोरी झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
संजीवनी फडे यांनी सोने, चांदीचे दागिने एका साडीत बांधून ते टेबलाच्या खणात ठेवले होते, ते ही चोरटयांनी हातोहात लंपास केले आहेत. बारा लाख त्रेसष्ट हजार चारशे रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने, दोन लाख तीन हजार सातशे रुपयांचे चांदीचे दागिने आणि अन्य वस्तू, पन्नास हजार रुपये किंमत असलेला सोने, मोती जडित खंडेलवाल सेट, एक मोबाईल तसेच 50 हजारांची रोख रक्कम असा एकूण पंधरा लाख सत्तर हजारांचा ऐवज चोरीस गेला आहे.
सदर प्रकरणी पोलिसांत फिर्याद देण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी वेगाने तपास सुरु केला आहे