भाजपा युवा मोर्चाचे पंढरपूर शहरध्यक्ष विदुल अधटराव विरुध्द सावकराकीचा गुन्हा दाखल

४८ चेक, ९ हिशोब वहया, कोरा स्टॅम्प, चेकबुके पोलिसांनी केले जप्त

पंढरपूर : ईगल आय मीडिया

भाजपा युवा मोर्चाचे पंढरपूर शहरध्यक्ष विदूल पांडूरंग अधटराव (रा.संतपेठ, पंढरपूर) यांच्याविरुध्द पंढरपूर शहर पोलिसांत अवैध सावकराकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी पोलीस आणि सहाय्यक निबंधक यांच्या पथकाने घेतलेल्या त्यांच्या घरझडतीमध्ये एकूण ४८ चेक, ९ हिशोब वहया, कोरा स्टॅम्प, चेकबुके, बॅकपासबुके सह रोख रक्कम २९ हजार ३४० रूपये जप्त करण्यात आले आहेत.

पंढरपूर शहरात खाजगी सावकारकीचे स्तोम माजले असून भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विदूल पांडूरंग अधटराव यांच्याविरुध्द खाजगी सावकाराची तक्रारी पोलिस ठाण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरी तपासणी केली. या तपासणी प्रदिप भानुदास सावंत (सहकार अधिकारी श्रेणी-१ रा.सहा. निबधंक सहकारी संस्था) यांच्या समक्ष पोलिसांनी दस्तऐवजासह रोख रक्कम जप्त केली आहे.

विदूल पांडूरंग अधटराव खाजगी सावकार व त्याचे अन्य साथीदार यांचा शोध घेवून त्यांचेकडेही अधिक तपास पोलीस करत आहेत. त्यांचेकडून आणखीन असेच प्रकारचे अवैध सावकारकीचे प्रकार घडले असण्याची अथवा घडत असण्याची शक्यता आहे.

पंढरपूर शहर पोलिस ठाणे गु.र.नं. १३५/२०२१ महाराष्ट्र सावकारी (नियमन)अधिनियम २०१४ चे कलम ३९, ४५ सह भा.दं.वि.कलम ५०६ प्रमाणे विदूल पांडूरंग अधटराव यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत भागवत, पोलीस कर्मचारी गोविंद कामतकर, सुनील पवार, निता डोकडे यांनी केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!