शहर पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल
पंढरपूर : eagle eye news
कासेगावात तुझी लय हवा आहे, तुझी हवा जिरवतो, असे म्हणत डोक्यात काचेची बाटली फोडून जखमी केले, शिवाय जखमी सोबत असलेल्या त्याच्या अन्य डून मित्रांनाही मारहाण करून त्यांनी आणलेल्या रिक्षाची तोडफोड केल्या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. निखिल संतोष धोत्रे असे या प्रकरणातील जखमी फिर्यादीचे नाव आहे.
निखिल धोत्रे हा ३० मार्च रोजी रंगपंचमी खेळून झाल्यानंतर सायंकाळी ४ वाजता पंढरपूर येथील मांडव खडकी परिसरातून चंद्रभागा नदीकडे अंघोळीसाठी निघाला होता. यावेळी त्याच्यासोबत आकाश देशमाने याच्या रिक्षात बसलेले सागर होनमाने, आकाश देशमाने असे मित्र होते. नदीच्या जवळ आल्यानंतर आयुष पानकर याने निखिल धोत्रे याच्या जवळ जाऊन तुझी कासेगावात लै हवा आहे, तुझी हवा जिरवतो असे म्हणून त्याच्या डोक्यात काचेची बाटली मारून त्यास जखमी केले. आयुष पानकर, शुभम परदेशी, विनायक शेटे, विकास जाधव, शिवकांत पाणकर यांनी शिवीगाळ करून मारहाण केली.
त्यास सोडविण्याकरिता आलेल्या मित्रांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आकाश देशमाने याची रिक्षाची काच, टफ फोडून रिक्षाची तोडफोड केली. या प्रकरणी आयुष पानकर, शुभम परदेशी, विनायक शेटे, विकास जाधव, शिवकांत पाणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.