पाथरी पोलिसांची कामगिरी : 2 जण अटकेत
टीम : ईगल आय मीडिया
पाथरी ( जि. परभणी ) पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी 8 किलोमीटर पाठलाग करून पकडलेल्या ह्युंडाई कारमध्ये 11 लाख 30 हजार रुपये किमतीचा तब्बल 226 किलो गांजा आढळुन आला. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली असून 1 जण फरार झाला आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीडकडे जाणा-या हुंडाई कार (क्र. एम.एच.०३ बी.सी.५०३२) या कार चालकाला शहरातील सेंट्रल नाका परिसरात पोलीस वाहनाची तपासणी करत असल्याचे दिसले़. पोलीस।दिसताच कार चालकाने कार परत फिरवली़ ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला.
यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी चोर असल्याच्या अंदाजाने कार जवळ जाऊन पाहिले असता गाडीतील कोणीही बाहेर आले नाही. याच वेळी पाठलाग करणारे पोलीस पथक त्या ठिकाणी पोहचले़. पोलिसांना पाहताच कार चालक बाळू श्रीरंग चोरमले फरार झाला. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता गाडीत गांजा आढळून आला.
वेगाने जाणारी कार शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर बोरगव्हान येथे गतिरोधकावर आदळली़. यात कारचे चेंबर फुटल्याने कार चालकाने गाडी रस्त्याच्या खाली घेतली. पोलिसांकडून वाहन तपासणी सुरू असल्याचे दिसताच पळून जाणा-या कारला पोलिसांनी आठ किलोमीटर पाठलाग करीत पकडले़ कारची तपासणी केली असता गाडीत सव्वादोन क्विंटल गांजा आढळून आला. ही कारवाई शुक्रवारी पहाटे ४ वाजता करण्यात आली़ असून एक जण फरार झाला.
घटनेचे गांभीर्य पाहून पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान सकाळी शासकीय पंचा समक्ष पोलिसांनी पंचनामा केला असता गाडित दोन क्विंटल २६ किलो अंदाजे ११ लाख ३० हजार रूपयांचा गांजा सापडला़
सहाय्यक पोलीस निरीक्षक सोंमवशी यांच्या फियार्दीवरून अमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून कार मधील मारोती रामराव गोलेगावे (रा.समर्थ साखर कारखाना, ता़.आंबड जि़.जालना) व शीला संतोष रहाडे ( रा.रुई धानोरा ता. गेवराई) यांना अटक करण्यात आली़ असून घटनेटचा तपास पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण करीत आहेत.