अल्पवयीन मुलाकडे चारचाकी देणे विशाल अगरवाल याच्या अंगाशी आले.
पुणे : eagle eye news
पुण्यात एका बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने आपल्या आलीशान कारने चिरडून दोघांचा जीव घेतला. याप्रकरणात आता आरोपी अल्पवयीनचे वडील विशाल अगरवाल याला संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल होताच तो पुण्यातून फरार झाला होता. पोलिसांनी त्याला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे, मात्र या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला अवघ्या १२ तासात जामीन मंजूर झाला आहे.

पोलिसांनी कायदेशीररित्या त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. सोबत त्याला पबमध्ये दारू पुरवणाऱ्या पब मालकासह मॅनेजर आणि बार टेंडरवर ही गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. यानंतर वडील विशाल अगरवाल हा पुण्यातून फरार झाला होता. पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला संभाजीनगर येथून अटक केली आहे. विशाल अगरवालवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात शनिवारी रात्री साडे तीनच्या सुमारास कल्याणीनगर परिसरात एका आलिशान कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की दुचाकीवरील तरुणी काही फूट वर उडून जमिनीवर आपटली, तर तरुण दुचाकीसोबत काही अंतर फरपटत गेला. या घटनेत दोघांच्याही डोक्याला जहर मार लागून त्यांचा मृत्यू झाला. अनिस अहुदिया आणि अश्विनी कोस्टा अशी मृतांची नावं आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक केली होती. मात्र, त्याच्यावर लावण्यात आलेले कलम हे जामीनास पात्र असल्याने त्याला जामीन देण्यात आला होता. यावरुन नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला. त्यानंतर अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्याचे वडील विशाल अगरवालवर गुन्हा दाखल होताच तो पुण्यात फरार झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.