पंढरपूर : मतिमंद महिलेवर लैंगिक अत्याचार


आरोपीस अटक : 6 दिवसाची पोलीस कोठडी


पंढरपूर  ; eagle eye news
मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने तिला दिवस गेले. ही गोष्ट उघडकीस येताच संशयित आरोपी विरोधात पंढरपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून आरोपीस 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अर्जुन सूर्यकांत कदम ( वय 37 वर्षे, रा. पंढरपूर ) असे आरोपीचे नाव आहे. 


 यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार आरोपी अर्जुन कदम हा  मागील सहा ते सात महिन्यापासून घरात कोणीही नसताना त्या मतिमंद मुलीस गाईच्या गोठ्यात बोलवायचा व तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. त्या मतिमंद महिलेच्या घरच्यांना याबाबत कसलीच माहीत नव्हती. 


मात्र मंगळवार ( दि. 13 ) रोजी सदर मतिमंद महिला पोट दुखत असल्याचे सांगून पोटास हात लावून बसली होती. यावेळी त्या महिलेच्या बहिणीस मतिमंद महिलेचे पोट वाढल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी महिलेची  आरोग्य तपासणी केली असता तीस गर्भधारणा झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी  शहर पोलीस ठाण्यात जाऊन संशयित अर्जुन सूर्यकांत कदम (वय ३७) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि प्रशांत भागवत करत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!