शेवते येथे एका रात्रीत तीन दुकाने फोडली

पंढरपूर : ईगल आय मीडिया

शेवते ( ता. पंढरपूर ) येथील 3 दुकाने सोमवार (दिनांक 12) ते मंगळवार पहाटेच्या दरम्यान फोडून त्यातून 30 हजार रुपये रोख रक्कमेसह सुमारे 60 हजार रुपयांच्या वस्तू लंपास करण्यात आल्या. या घटनेमुळे शेवते परिसरात खळबळ उडाली आहे.

शेवते येथे बस स्थानक परिसरात आणि मुख्य चौकात श्रीराम कृषी केंद्र, विठ्ठल रिवायडींग आणि सिद्धनाथ किराणा अशी तीन दुकाने आहेत.

मंगळवार (दि. 13) रोजी सकाळी आठ वाजता श्रीराम कृषी केंद्राचे मालक अक्षय उलभगत हे दुकान उघडण्यास आले असता यांना दुकानाच्या पाठीमागून गॅस कटरने पत्रा कापून चोरी झाल्याचे लक्षात आले.

त्याचबरोबर याच दुकान शेजारी असलेले विठ्ठल रिवायडींग आणि सिद्धनाथ किराणा हे दुकान फोडल्याचे निदर्शनास आले. सिद्धनाथ किराणा दुकानाच्या गल्यातील सुमारे रोख तीस हजार रुपये, लॅपटॉप आणि पाणी फिल्टर चे जमा झालेली पाच रुपयांची चिल्लर असा सुमारे 50 ते 55 हजार रुपयांचा ऐवज चोरी करण्यात आला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!