शिंगणापूर घाटात लुटणारी दरोडेखोरांची टोळी जेरबंद

फोटो : नातेपुते पोलीस स्टेशन अधिकारी युवराज खाडे,पोहेका शरद कदम,राहुल रणवरे, अनिल गडदे,महेश पाटील, राकेश लोहार

नातेपुते पोलिस, सायबर शाखेचीकामगिरी

नातेपुते : सुनिल गजाकस

माळशिरस तालुक्यातील कोथळे घाट मार्गात रात्रीच्या वेळी देवदर्शनाला जाणा-या प्रवाशांना अडवून लूटमार करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात नातेपुते पोलिसांना यश आले आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार; कोथळे – शिखर शिंगणापूर घाट मार्गात दि.११ मार्च रोजी रात्री १०.३०वा. येवती ( जि.उस्मानाबाद ) येथील भाविक शिखर शिंगणापूर येथे महादेवाचे दर्शनासाठी जात असताना सात अज्ञात दरोडेखोरानी दुचाकीवरून पाठलाग करून चारचाकी क्रूझर जीप जबरदस्तीने अडवली. वाहनांच्या काचा फोडुन चालकाला हारहाण करत दहशत निर्माण केली व गाडीतील प्रवाशांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम 1 लाख 5 हजार रुपये चा मुद्देमाल लंपास करून अंधाराचा फायदा घेत फरार झाले.
नातेपुते पोलीस स्टेशन येथे वाहन चालक चैतन्य सखाराम बंडोरे (वय३०रा यवती उस्मानाबाद)यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दरोडेखोरांवर भा द वि ३९५,३४१, ४२७,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल झाला होता.नातेपुते पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि.युवराज खाडे यांनी पोलिस यंत्रणा राबवत मागावर पथक नेमून पोलिस खब-या मार्फत व सायबर शाखेच्या मदतीने माहीती मिळवून सदर गुन्हा करणारे संशयित सराईत आरोपी टोळी गोखळी (ता.फलटण ). येथे विटभट्टीवर काम करत असल्याची माहिती हाती आली.लागलीच पथकाने साफळा रचुन टोळीतील तीन आरोपी ताब्यात घेतले. राहुल आप्पा माळी (वय१९ रा.मुसळवाडी) अहमदनगर, राहुल उर्फ टग्या एकनाथ बर्डे(वय२२ रा.पढेगाव) संदीप सुरेश पिंगळे ( वय२२.मनेगाव) ही आरोपीची नावे आहेत.आरोपीची कसुन चौकशी केल्यावर गुन्हा त्यांनी कबूल केला आहे. त्यांना अटक करून न्यायाल्यात हजर केले. त्याना सहा दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे.या गुन्ह्याचा तपास सपोनि युवराज खाडे,पो.हे.काॅ.अनिल गडदे, शरद कदम, गुन्हे शाखेचे राहुल रणवरे,पो.ना.महेश पाटील,पोहेकाॅ राकेश लोहार,सायबर शाखेचे पो का रवि हातकिले,यानी या गुन्हाची या पथकाने यशस्वी कामगिरी केली आहे.चोरी गेलेले ऐवज अद्याप पोलिसांच्या ताब्यात मिळालेले नाही.गुन्ह्यातील चार साथीदार सहआरोपी अजुन फरार असून त्यांच्या मागावर पोलिस असून लवकरच त्यांच्या मुसक्या आवळल्या जातील असे नातेपुते सपोनि युवराज खाडे यांनी सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!