विकणाऱ्या एकास पोलिसांनी केली अटक
टीम : ईगल आय मीडिया
तब्बल 15 लाख रुपये किंमत असलेले मांडूळ विकण्यासाठी घेऊन आलेल्या एकास भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी योगेश म्हेत्रे हा तस्कर आला होता. त्यावेळी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १५ लाख रुपये किंमत असलेले मांडूळ पोलिसांनी हस्तगत केले असून, ते वन विभागाच्या कर्मचाऱ्याकडे सुपूर्द केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रायणी नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात व्यक्ती हा मांडूळ जातीचा साप विक्री करण्यास येणार असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, वनरक्षक सुरेश बरले यांना याची माहिती दिली. त्यानंतर, संबंधित ठिकाणी भोसरी पोलिसांनी सापळा रचला, संशयितरित्या थांबलेल्या योगेश मरिआप्पा म्हेत्रे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेे.
त्याच्याकडे असलेल्या प्लॅस्टिकच्या पोत्यातील डब्ब्यात १५ लाख रुपये किंमतीचे मांडूळ आढळून आले. तो मांडूळ विक्रीसाठी आणला होता अस त्याने पोलिसांना सांगितलं आहे. मांडूळ जातीच्या सापाचे रक्त हे दुर्धर आजारांवर औषध म्हणून वापरले जाते. तसेच मांडूळबद्दल अनेक अंधश्रद्धा असल्याने पैशांचा पाऊस पाडण्यासाठी देखील मांडूळ खरेदी केले जाते, असं भोसरी पोलिसांनी सांगितल आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे आणि गुन्हे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.