सोलापूर महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मानसिक त्रास दिल्याचा आरोप

सोलापूर : ईगल आय मीडिया

सोलापुरात महिला पोलीस अंमलदाराने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली आहे. सोलापूर शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात ही महिला पोलिस अंमलदार कार्य़रत होती.
याच पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मानसिक त्रास दिला आणि त्यामुळेच महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप मृत महिला कर्मचाऱ्याच्या पतीने केला आहे.

महिलेने आत्महत्या कशामुळे केली ? हे प्राथमिक तपासात पुढे आलेलं नाही. महिलेचे नातेवाईक सध्या दु:खात असल्याने अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. मात्र या घटनेचा सविस्तर तपास करुन जर कोणी दोषी असेल तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल,” अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली.


या घटनेबाबत पोलिसात अद्याप कोणतीही तक्रार नोंद केलेली नाही.
सोलापूर शहरपासून जवळ असलेल्या एका गावाजवळ महिलेने विष प्राशन केलं होतं. महिलेच्या नातेवाईकाने बेशुद्धावस्थेत तिला खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.


दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करत महिला पोलीस अंमलदाराने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने सोलापूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!