तिघांना संपवून भावाला फोन केला : कर्जबाजारी हॉटेल व्यावसायिकाचे दुष्कर्म
सोलापूर : ईगल आय मीडिया
सोलापूर येथील कर्जबाजारी पतीने पत्नीसह आपल्या दोन मुलांसह हत्या केली आहे. दरम्यान घटनास्थळी चिट्ठी सापडली असून कर्जबाजारी झाल्याने कुटुंब संपवून आत्महत्या केली असल्याचे समजते.
सोलापूर येथील
जुना पुना नाका( हांडे प्लॉट) येथे पती अमोल जगताप ( वय35 ) आणि पत्नी मयुरी जगताप ( वय28 ) असे त्या दाम्पत्याचे नाव आहे. त्यांनी मुलगा आदित्य ( वय 7 वर्षे) मुलगी आयुषी ( वय साडे चार वर्षे ) या 2 मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
अमोल जगताप हा जुना पुना नाका हांडे प्लॉट येथील राजपूत यांच्या घरात भाडयाने राहात होता. त्याची पत्नी मयुरी, आदित्य आणि आयुष असे दोन मुले असा त्यांचा संसार असून तो सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी जवळील ग्यालेक्सी हॉटेल बिअर बार चालवत होता.
अमोल जगताप याने आत्महत्या करण्यापूर्वी भावास फोन करून, मी तीन जणांना संपविले आहे, आता मी ही आत्महत्या करीत आहे असे सांगितल्याची माहिती मिळाली. भाऊ घरी गडबडीत जाईपर्यंत स्वतःला संपविले होते.
कर्जबाजारीपणामुळे खून आणि आत्महत्या
मी अमोल जगताप कर्जबाजारी झाल्यामुळे पत्नी आणि दोन्ही मुलांना जीवे मारून मी स्वत: आत्महत्या करीत आहे असा मजकुर असलेली चिठ्ठी अमोल जगताप यांच्या घरात मिळून आली असून त्याची तपासणी करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना सांगितले.
शेजारी राहणाऱ्यांनी पोलीसांना ही खबर दिली त्यावरून फौजदार चावडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, पोलीस हवालदार आबा थोरात यांच्यासह कर्मचारी हांडे प्लॉट येथे आले आणि त्यांनी जगताप यांच्या घरात पाहणी केली त्यावेळी अमोल जगताप, दोन मुले हे गळफासाने लटकत होते तर पत्नी मयुरी ही पलंगावर पालथी पडून होती पोलीसांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा केला आणि परिसरातील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र गायकवाड, सिव्हिल मधील लादेन यांच्या मदतीने मृतदेह शासकीय रुग्णालयाकडे उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त बांगर यांनी घटनास्थळाला भेट दिली.