जुगाराच्या पैशासाठी खुन : मुलगा पोलिसांच्या ताब्यात
सोलापूर : ईगल आय मीडिया
सोलापुरातील मित्र नगर परिसरात मुलाने डोक्यात लोखंडी फुंकरी मारून आईचा खून केल्याची घटना घडली आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी असलेल्या मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. असून मुलाने आईचा खून केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी पोलिस अधिकारी जमा झाले आहेत.
डोक्यावर परिणाम झालेल्या मुलाने आईकडे जुगारासाठी पैसे मागितले.फिट येत असलेल्या मुलावर औषधोपचार सुरू होते.सोलापूर बाजार समितीत तो मिळेल ते काम करत होता.मात्र, त्याला जुगाराचे व दारूचे व्यसन होते.आईने जुगारासाठी पैसे न दिल्याच्या रागातून त्याने सोमवारी पहाटे दीडच्या सुमारास लोखंडी फुकारीने आईच्या डोक्यावर मारून खून केला.आईचा खून केल्याप्रकरणी अतुल एकनाथ कोळेकर (रा.मित्रनगर, परमशेट्टी मिलमागे) याला जोडभावी पेठ पोलिसांनी अटक केली आहे.
सोलापुरातील मित्र नगर परिसरात राहणाऱ्या वंदना एकनाथ कोळेकर ( वय वर्ष 48 ) यांच्या कपाळावर, डोक्यावर लोखंडी फुकारी मारून खून झाल्याची घटना काल रात्री दीडच्या सुमारास घडली होती. डोक्यावर कपाळावर जबर जखमा झाल्याने महीलेचा जागेवरच मृत्यू पावल्याची माहिती देण्यात आली आहे.
याप्रकरणी मयत वंदना कोळेकर यांचा मुलगा अतुल कोळेकर (वय वर्ष 28, मित्र नगर शेळगी) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ माजली असून अनेक प्रकारच्या चर्चांना ऊत आला आहे.