सातारा-पंढरपूर एसटी बसवर दरोड्याच्या हेतूने दगडफेक : प्रवासी जखमी
टीम : ईगल आय मीडिया
मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सातारा- पंढरपुर रस्त्यावरील म्हसवड जवळच्या पिलीव ( ता. माळशिरस , जि. सोलापूर ) या घाटात चार ते पाच अज्ञात दरोडखोरांनी एसटी व मोटरसायकल चालकावरही दगडफेक केल्याची घटना घटना घडली आहे. राज्य परिवहन महामंडळाची बस ( क्र. MH-06, S-8971 ) वर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरोड्याच्या उद्देशाने झुडपात लपून बसलेल्या हुल्लडबाजांनी ये-जा करणाऱ्या गाड्यांवर दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच, एसटीवर ही दगडफेक झाली असून, गाडीच्या काचा फुटल्या आहेत. माळशिरस आणि म्हसवड पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. पंढरपूर-सातारा परिसरात कोंबिंग ऑपरेशन सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली आहे.
दारोड्याच्या उद्देशाने झुडपात लपून बसलेल्या दरोडेखोरांनी गाड्यांवर दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सात ते आठ अज्ञात व्यक्तींनी एसटी बसवर व मोटारसायकलवर दगडफेक केली.यामध्ये मोटारसायकलीवरुन चाललेल्यांना आणि बसच्या ड्रायव्हरला प्रवाशांना दगड लागला असून यामध्ये ते जखमी झाले आहेत. मात्र अद्याप कोणतीही चोरीची घटना झाली नसल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
यामध्य़े मोटारसायकलचा चालक व बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच माळशिरस व म्हसवड पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत. पंढरपूरमधून साताऱ्याकडे एसटी जात असताना ही घटना घडली. पंढरपूर-सातारा रस्ता दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला. ही घटना सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत घडली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच माळशिरस व म्हसवड पोलिस घटनास्थळी रवाना झाले.