सुपलीच्या एकाचा लातुर जिल्ह्यात खून !


महिलेसह निलंग्याच्या युवकास अटक


पंढरपूर : प्रतिनिधी
सुपली ता. पंढरपूर येथील भाऊसाहेब जगन्नाथ माळी ( वय ६० वर्षे )  यांचा  पानचिंचोली ( ता.निलंगा, जिल्हा लातूर ) येथे  खून झाल्याचे उघड झाल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधातून हा खुन  झाल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. 


सुपली येथील भाऊसाहेब जगन्नाथ माळी हे २८ मे रोजी दुपारी १२.३० वाजता पंढरपूरातून  पैसे घेवून येतो  असे सांगून घरातून गेले होते. माञ ते परत न आल्याने कुटुबांनी सर्वञ शोध घेवून २९ मे रोजी  पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात हरवल्याबाबत भाऊसाहेब यांचा मुलगा सुशांत माळी याने तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल होताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली  पो नि धनंजय जाधव यांनी तपास सुरू केला होता.

  यामध्ये भाऊसाहेब माळी‌ यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन निलंगा तालुक्यात दिसून येत होते, त्यानुसार पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी निलंगा पोलिसांशी संपर्क साधला. पानचिंचोली येथे  सापडलेला मृतदेह भाऊसाहेब माळी यांचा असल्याचे निष्पन्न झाले. 
 यासंदर्भात  मिळालेल्या माहितीनुसार, सुपली ता.पंढरपूर येथील भाऊसाहेब जगन्नाथ माळी या इसमाचे पंढरपूर  ( सांगोला रोड )  येथील साधना चंद्रकांत धुमाळ , रा दत्त मंदिराजवळ, सांगोला रोड,पंढरपूर या  40 वर्षीय महिलेसोबत अनैतिक संबंध होते. या संबंधातून भाऊसाहेब माळी हे त्या महिलेच्या घरी वेळी अवेळी जात होते. त्यामुळे त्यांच्यात वाद ही होत होते. 

दरम्यान या महिलेची निलंगा जि लातूर येथील अमरनाथ अशोक किने ( वय 23 वर्षे ) या जिप चालक युवकाशी ओळख झाली. त्यामुळे साधना धुमाळ या महिलेने  भाऊसाहेब माळी याना अमरनाथ कीने याच्या चार चाकी वाहनातून कामानिमित्त म्हणून 28 मे रोजी लातूरकडे नेले.  जात असताना रात्री 8 वाजून 49 मिनिटांनी भाऊसाहेब माळी यांचा शेवटचा कॉल होऊन फोन बंद झाला होता. पान चिंचोली येथे आल्यानंतर कार मध्येच  भानुदास याचा प्रियकर युवकाच्या मदतीने गळा आवळून खून केला आणि मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून दिला. निलंगा पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटत नसल्याने बेवारस मृत्यू म्हणून अंत्यसंस्कार केले.


Leave a Reply

error: Content is protected !!