पिरळे येथील दोघांवर तलवारीने प्राणघातक हल्ला

सोलापूर : ईगल आय मीडिया

मौजे पिरळे(ता.माळशिरस) दि.२१ रोजी सकाळी १०.३०वा येथील राजेश नाथा दडस व नवनाथ तांबीले ( दोघेही रा.पिरळे, ता. माळशिरस ) हे दोघे चव्हाणवाडी (बांगार्डे) येथील बिरोबा देवाच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते.या ठिकाणी त्यांच्यावर सहा जणांनी नातेवाईकांना झालेला वादाचा राग मनात धरून तलवारी व लाठया काठ्यानी वार करून‌ गंभीर जखमी केले आहे.

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर हकिकत अशी‌ की; चव्हाणवाडी येथील बिरोबा देवाच्या दर्शनासाठी आलेल्या राजेश दडस ,नवनाथ तांबीले यांना सचिन विठ्ठल बुधावले, दिपक विठ्ठल बुधावले, बिरू विठू ,राजू भाळे, शंकर बोडरे, अमोल जाधव,या इसमानी दुचाकीवरून येवुन तुमचे नातेवाईक दत्तू लवटे यांनी, आमचे नातेवाईक आप्पा बुधावले ,अंकुश चव्हाण यांना का मारहाण केली यांचा जाब विचारत हल्ला करत नवनाथ तांबीले यांच्यावर या सहा इसमांनी तलवारीने व लोखंडी पाईप तसेच लाठी काठीने जोराचे वार केले .यामध्ये राजेश व नवनाथ दोघेही गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर दवाखान्यांमध्ये उपचार सुरू आहेत . नातेपुते पोलीस स्टेशन येथे राजेश‌ नाथा दडस यांनी या सहा इसमांच्या विरोधात फिर्याद दिली आहे .
सदर घटनेतील आरोपींवर गुन्हा रंजि.नं १८५ /२० भा.द.वि कलम ३०७,५०४,५०६, १४३,१४७,१४९तसेच शस्त्र अधिनियम मु.का १३५ प्रमाणे नातेपुते पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवला आहे.घटनेतील सर्व आरोपी फरार असून घटनेला २४ तास उलटून गेले तरीही त्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.सदर घटनेची माहिती मिळताच अकलूज उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांनी घटनास्थळी पाहणी करून मार्गदर्शन केले. सदर घटनेचा पुढील तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी युवराज खाडे करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!