टेंभुर्णी पोलिसांची कामगिरी : 4 आरोपी आणि 6 लाखांचा मुद्देमाल जप्त
टेंभुर्णी : ईगल आय मीडिया
विक्रीसाठी निघालेला सुमारे 10 किलो गांजा आणि स्विफ्ट कार टेम्भुर्णी पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडली आहे. गांजा आणि कारसह 6 लाखांचा मुद्देमाल आणि 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस फौजदार अभिमान गुटाळ हे आपल्या कर्तव्यावर असताना कुर्डूवाडी रोडवर टेंभुर्णी बायपास पुलाखाली एका कारमध्ये गांजा घेऊन काही व्यक्ती विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची खबर गुप्त खबरे मार्फत मिळाल्याने सापळा लावला होता. त्यानुसार गुरुवारी ( दि 27 रोजी ) स्विफ्ट कार नंबर ( एम एच ०६ सीबी ३५७३ ) मध्ये विक्रीसाठी निघालेला ९ किलो ९५० ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी मोठ्या शिताफीने दुपारी २ च्या दरम्यान पकडला. असून याबाबतची खबर सहाय्यक पोलीस फौजदार अभिमान गुटाळ यांनी टेंभुर्णी पोलीसांना दिली
प्रशांत बिभीषण उकरंडे वय (२३ वर्ष) अविनाश चंद्रकांत हरकरे वय( ३० वर्ष) समाधान दिलीप हलकरे वय ( ३० वर्ष) जासम मोहम्मद जीमल शेख वय (२२ वर्ष) ( सर्व रा.तेरखेडा तालुका बार्शी जिल्हा उस्मानाबाद ) या
४ जणांना अटक केली आहे.
यांच्यावर कलम ५०४ / २०२० एनडीपीएस ॲक्ट १९८५ चे कलम २० ( ब ) नुसार टेंभुर्णी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर १५००० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल, रोख रक्कम २६१० रुपये आणि मारूती स्विफ्ट कार असा एकूण ६ ,१७, ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे हे करीत आहेत.