पंढरपूर : ईगल आय मीडिया
पळशी ( ता.पंढरपूर ) येथे 4 डिसेंम्बर च्या रात्री अज्ञात चोरट्यानी खिडकीतून घरात प्रवेश करून 4 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. यामुळे पळशी, सुपली, उपरी परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत चे सविस्तर वृत्त असे की, पळशी येथील कैलास पोपट कलागते यांच्या घरात अज्ञात चोरट्याने 4 डिसेंम्बर च्या रारात्री ते पहाटे च्या सुमारास खिडकीतून घरात प्रवेश केला आणि कपाटाच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेले सोन्याची चेन, सोन्याचे मंगळसूत्र, नेकलेस, अंगठ्या, बोरमाळ, झुबे, कानातील रिंग, सोन्याचे बदाम तसेच रोख 10 हजार रुपये आणि मोबाईल असा सुमारे 4 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
यासंदर्भात पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान या चोरीमुळे पळशी, सुपली, उपरी, धोंडेवाडी, गारडी, भाळवणी परिसरात खळबळ उडाली आहे.