सांगली जिल्ह्यात 3 जणांचा खून

4 जण गंभीर जखमी

टीम : ईगल आय मीडिया

सांगलीच्या पलूस तालुक्यातील दुधोंडी येथे आज दुपारी भर दिवसा दोन गटात झालेल्या हाणामारीत तिघांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दुधोंडी येथील वसंतनगर भागात हा तिहेरी खून झाला. या घटनेमुळे दुधोंडी तसेच सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धारदार शस्त्राने वार करुन तिघाची हत्या केल्याची माहिती मिळते आहे. या हल्ल्यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अरविंद साठे, विकास मोहिते, सनी मोहिते अशी हत्या करण्यात आलेल्यांची नावे असून या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यातील दुधोंडीमधील वसंतनगर येथे तिहेरी खून झाला आहे. अरविंद साठे, विकास मोहिते, सनी मोहिते असे खून झालेल्यांची नावे आहेत. या खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र पूर्ववैमनस्यातून तसेच जयंती साजरी करण्यावरून ही घटना घडल्याचे सांगितले जाते.

हत्येपूर्वी दुधोंडी येथील मोहिते आणि साठे गटात तुफान हाणामारी झाली. नंतर या दोन गटांतील वाद टोकाला गेला. शेवटी भांडण वाढत गेल्यामुळे धारधार शस्त्राने वार करून यातील तिघांची हत्या करण्यात आली. तर चार जण गंभीर जखमी आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले आहे. असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस या घटनेची कसून चौकशी करत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!