पत्नीने मौलवीच्या गुप्तांगावरच केला वार
टीम : ईगल आय मीडिया
७७ वर्षीय मौलवी वकील अहमदने तिसऱ्या लग्नाचा प्रयत्न चालवला होता. त्यामुळे चिडलेल्या त्याच्या बायकोने मौलवी च्या गुप्तांगावर वार केल्याने मौलवी चा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
पी.टी.आय.च्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमधील भौरकला पोलीस स्टेशन परिसरातील शिकारपूर गावातील 77 वर्षीय मौलाना तिसरे लग्न करण्याच्या प्रयत्नात होता. त्याच्या बायकोने विरोध केला. मात्र तिसरं लग्न न करण्याच्या मागणीकडे मौलवी वकील अहमदने दुर्लक्ष केल्यानंतर पहिली पत्नी हाजराने त्याच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात मौलवीचा मृत्यू झाला असून पोलिसांनी त्याच्या पत्नीला अटक केली आहे. आरोपी महिलेने तिच्या नातेवाईकांच्या मदतीने मौलवीचे अंतिम संस्कार करण्याचा प्रयत्न केला. शेजारच्यांना याबद्दल संशयास्पद वाटले आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी विचारपूस केली असता महिलेने गुन्ह्याची कबुली दिली.