आळंदीत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

वारकरी शिक्षण संस्थेच्या परंपरेला काळिमा फासणारे कृत्य

टीम : ईगल आय मीडिया

आळंदी परिसरातील माऊली वारकरी शिक्षण संस्था चालकाने, शिक्षण घेण्यासाठी आलेल्या ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिवप्रसाद रामनाथ भोकनळ याला अटक करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवप्रसाद  भोकनळ हा मुलांना वारकरी संप्रदायासंदर्भात शिक्षण देत असतो. दोन महिन्यांपूर्वी आळंदी परिसरातील श्री माऊली वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ११ वर्षीय पीडित मुलाला वारकरी शिक्षणासाठी आई वडिलांनी पाठवले होते.


सर्व मुले हरिपाठ करण्यासाठी चालले होते. तेव्हा, पीडित मुलाला भोकनळने त्याला काम आहे असे म्हणून थांबवले. नंतर त्याला एका खोलीत नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य करण्यात आले. दरम्यान, पीडित मुलाला याची वाच्यता केल्यास तुला बघून घेईल अशी धमकी देखील शिवप्रसादने दिली.

दरम्यान, पीडित मुलाच्या घरी पाहुणे आल्याने त्याला आईने घरी आणले होते. तेव्हा, भोकनळ यांनी पीडित मुलाला तातडीने परत संस्थेत पाठवावे असे सांगितले. मात्र पीडित मुलगा संस्थेत जायचे नाही म्हणून रडायला लागला. आईने मुलाला विश्वासात घेऊन विचारले असता शिवप्रसादने अनैसर्गिक कृत्य केल्याचं त्या मुलाने आईला सांगितले.

याप्रकरणी आळंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!