वेळापुरात लॉजवर वेश्या व्यवसाय

पोलीसांची धाड : लॉज चालक, ग्राहकासह १० जणांवर कारवाई

माळशिरस : ईगल आय मीडिया
वेळापूर ( ता.माळशिरस ) येथे वेळापूर – पंढरपूर मार्गावरील यशराज हॉटेल एन्ड लॉज या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत हॉटेल चालक आणि ग्राहकांसह 10 जणांवर कारवाई2 करण्यात आली आहे.

संबंधित हॉटेल चालक बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय चालवित असल्याची बातमी अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांना मिळाली होती. त्यानंतर राजगुरू यांनी स्वत : व वेळापूर सपोनि.विश्वंभर गोल्डे , माळशिरस सपोनि एन.बी. यमगर , पोहेकॉ ननवरे , पो.ना. कणसे , पोना येणपे , मपोकॉ केंगले , मपोकॉ शिंदे या पथकाने पंचासह त्या ठिकाणी जावून छापा मारला.

यावेळी हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय करणारे हॉटेल चालक सचिन भगवान जाधव ( वय -२८ वर्षे रा . शेंडेचिंच ता.माळशिरस) रमेश भगवान मोरे (वय -३० वर्षे रा . वेळापूर ता.माळशिरस) यांना तसेच त्यांना मदत करणारे हॉटेल मधील कामगार सतिश गणपती गिडडे ( रा . आटपाडी जि.सांगली ), महेश नारायण पाठक ( रा . पंढरपूर ) तसेच ग्राहक म्हणून हॉटेलमध्ये आलेले अविनाश मधुकर सोरटे ( रा . अकलूज ), अमोल विलास सुळ, संतोष यशवंत वाघमोडे दोघे ( रा.साळमुख मळोली ता.माळशिरस) , ज्ञानेश्वर अर्जुन चव्हाण ( रा . तांबवे ता.माळशिरस ) या एकुण १० जणांना पकडून ताब्यात घेतले आहे .

त्या ठिकाणी वेश्या व्यवसायाकरीता अटकावून ठेवलेल्या दोन महिलांची सुटका करून त्यांना महिला सुधारगृहामध्ये पाठविले आहे.

ताब्यात घेतलेल्या वरील व्यक्तिविरुद्ध विरुध्द पोना / १७ ९९ महेश मुरलीधर पवार , नातेपुते पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वेळापूर पोलीस ठाणेमध्ये अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,६ इत्यादी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू , पोनि . व्ही.बी.गोल्डे , माळशिरस पो.ठाणे , सपोनि . एन.बी.यमगर यांच्या पथकाने केली आहे . गुन्हयाचा पुढील तपास अकलूज पोलीस ठाण्याचे पोनि . भगवान निंबाळकर हे करीत आहेत .

Leave a Reply

error: Content is protected !!