वाखरीत ५० लिटर्स हातभट्टीची दारू जप्त

एका विरुद्ध गुन्हा दाखल

पंढरपूर : प्रतिनिधी

वाखरी ( तालुका पंढरपूर ) येथे इंदिरा नगर वसाहत येथे छापा मारून अवैधरीत्या दारू विकिवर करणाऱ्या एका इसमा विरोधात पंढरपूर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५० लिटर्स हातभट्टीची दारू जप्त केली आहे.

यासंदर्भात पोलीस काँस्टे पाटील यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, अमोल प्रभाकर गुजर (वय-३७ वर्षे, रा वाखरी ) हा त्याच्या घराजवळ अवैध दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा मारून त्याच्या घराजवळ लपवून ठेवलेली ५ हजार रुपये किमतीची ५० लीटर हात भट्टी दारु जप्त केली.

या प्रकरणी अमोल गुजर याच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक फुगारे,पोहैकाॕ दादासाहेब सुळ,पोकाॕ. पाटील,पो.काॕ.मिसाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

error: Content is protected !!