आरोपी सुमित साखरे
माळशिरस : ईगल आय मीडिया
वेळापूर ( ता. माळशिरस ) गोळीबार प्रकरणात आणखी एका आरोपीस पोलिसांनी अटक केेली आहे. वेळापूर येथील सुमित संजय साखरे असे या आरोपीचे नाव आहे.
अधिक वृृत्त असे की, फिर्यादी भाऊसाहेब मच्छिंद्र मगर ( वय २८ रा. निमगाव मगराचे ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास डाॅ. नाईक हाॅस्पिटलच्या गेटजवळ भाऊसाहेब रामचंद्र मगर आणि त्यांचा मेहुणा कृष्णराव सुभाष चव्हाण ( वय २९ ) हे दोघेजण गप्पा मारत थांबले आसताना पुर्ववौमनस्यातुन त्यांच्यावर विपुुल नामदेव पोरे ( रा. वेळापुर ) याने एक गोळी झाडली. ते खाली वाकल्याने झाडलेली गोळी लागली नाही. विपुल पोरे याने त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व विपुल पोरे हा पळुन गेला होता. त्याच्यावर वेळापुुर पोलिस स्टेशनला कलम ३०७, हत्यार अॅक्ट ३ व २५ प्रमाणे गुन्हा नोंद झाला होता.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी विपुल पोरे यांस न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. यातील मुख्य आरोपी विपुल पोरे यांस साथ देणे, पुरावा नष्ट करणे आदींमुळे साखरे यांस वेळापूर पोलिसांनी अटक केली आहे.
तर सुुुमीत साखरे यांस वेळापूर पोलिसांनी अटक केली असून काल त्याला माळशिरस न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सोमवार पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.