आरोपी पळून गेला
माळशिरस : ईगल आय मीडिया
वेळापूर (ता.माळशिरस ) येथे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या युवकांमध्ये झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी ( दि. 5 ) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून गोळीबार करणारा आरोपी पळून गेला आहे. वेळापूर ( ता. माळशिरस ) येथे सायंकाळी ५.४५ या सुमारास अकलुज – सांगोला रोडवर डाॅ नाईक हाॅस्पिटलसमोर आज सोमवारी गोळीबार झाला.
अधिक वृृत्त असे की, फिर्यादी भाऊसाहेब मच्छिंद्र मगर ( वय २८ रा. निमगाव मगराचे ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास डाॅ. नाईक हाॅस्पिटलच्या गेटजवळ भाऊसाहेब रामचंद्र मगर आणि त्यांचा मेहुणा कृष्णराव सुभाष चव्हाण ( वय २९ ) हे दोघेजण गप्पा मारत थांबले आसताना पुर्ववौमनस्यातुन त्यांच्यावर विपुुल नामदेव पोरे ( रा. वेळापुर ) याने एक गोळी झाडली. ते खाली वाकल्याने झाडलेली गोळी लागली नाही. विपुल पोरे याने त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व विपुल पोरे हा पळुन गेला आहे. त्याच्यावर वेळापुुर पोलिस स्टेशनला कलम ३०७, हत्यार अॅक्ट ३ व २५ प्रमाणे गुन्हा नोंद झाला असुन याचा अधिक तपास सपोनि दिपक जाधव हे करीत आहेत. पुढील तपास चालू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी आले होते, त्यांनीही पाहणी केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
दरम्यान, या घटनेतील सहभागी युवकाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे समजते. यातील गोळीबार करणारा युवक यापूर्वी हद्दपार करण्यात आलेला होता असेही सांगितले जाते. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.