कोरोनाचा बहाणा : प्रियकराच्या मदतीने पाटील संपवलं
टीम : ईगल आय मीडिया
जीवघेण्या करोनावर मात करून त्याने मृत्यूला हुलकावणी दिली. करोनातून बरा झाला, मात्र पत्नीनेच त्याचे प्राण घेतले. अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरणार्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा दाबून हत्या केली. पुणे जिल्ह्यातील उरुळी देवाची येथे ही घटना घडली आहे. संबंधित पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी देवाची (ता.हवेली,जि. पुणे ) येथे मयत मनोहर हांडे हा पत्नी सह राहत होता. मनोहर याला मागील महिन्यात करोना आजार झाला, मात्र तो घरीच करोनावर उपचार घेत होता. त्यातून तो बरा देखील झाला होता. त्याच दरम्यान २४ मे रोजी त्याचा मृत्यू झाला.
करोनाने त्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या पत्नीने कुटुंबियांना सांगितलं. मात्र,पोलिसांना त्यांच्या खबऱ्याने मनोहरची हत्या करण्यात आल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी गौरव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर, मनोहर याची पत्नी आणि अश्विनी या दोघांनी खून केल्याची कबुली त्याने दिली.
अश्विनी आणि गौरव यांचे दोघांचे मागील दोन वर्षापासून अनैतिक संबंध होते. दरम्यान, मनोहर याला करोना झाला. त्याच्यावर घरीच उपचार सुरू होते आणि त्यामुळे त्या दोघांना भेटता येत नव्हते. भेटता येत नसल्याने दोघांनी मनोहरला मारून टाकायचे असं ठरवलं. त्यानुसार अश्विनी हिने २३ मे रोजी रात्री मनोहरच्या दुधात झोपेच्या गोळ्या दिल्या. झोपेच्या गोळ्या दिल्याने त्याला लगेच झोप लागली. त्याच रात्री अश्विनी आणि गौरव या दोघांनी गळा आणि तोंड दाबून खून केला. त्यानंतर आरोपी गौरव हा घटनास्थळावरून निघून गेला.
दुसर्या दिवशी सकाळी मयत मनोहर हा उठत नसल्याचे, अश्विनीने दुसर्या मजल्यावर राहणार्या आईवडिलांना सांगितलं. काही वेळाने सांगितले की, मनोहर याचा करोनामुळे मृत्यू झाला, असं सांगत तिने झालेली घटना लपवली. मात्र तिने बनाव केल्याचे नंतर समोर आले. त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी गौरव मंगेश सुतार आणि अश्विनी मनोहर हांडे या दोघांना अटक केली.