नागपुरातील युवकाचा अंगलट आलेला प्रयोग
टीम : ईगल आय मीडिया
यूट्युबवर पाहून त्याने बॉम्ब तयार केला, मात्र नष्ट करण्याची माहिती नसल्याने त्याने थेट पोलीस ठाणे गाठले. नागपुरातील राहुल पगाडे ( वय २५ वर्ष ) या तरुणाने बॉम्ब तयार करण्याच्या नादात काहीतरी अर्धवट तयार केले. मात्र, हे स्फोटक निकामी होत नसल्याने या तरुणाने अखेर थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणि पोलिसांनी चौकशी नंतर त्याला अटक केली. नंदनवन पोलीस ठाण्यात शनिवारी हा सगळा प्रकार घडला.
राहुल पगाडे हा युुुवक नागपुरातील नंदनवन पोलीस स्थानकात स्फोटक पदार्थ असलेली बॅग घेऊन आला. सुरुवातीला त्याने आपल्याला ही बॅग रस्त्यात सापडल्याची बतावणी केली. पोलिसांनी बॅग तपासली असता त्यात इलेक्ट्रिक सर्किट दिसले. सोबतच मोबाइल बॅटरी, काही वायर्सचे तुकडे, एक लायटर, एक बल्ब आणि एक साधा मोबाइल अशा वस्तू त्यांना बॅगमध्ये सापडल्या. आय किल यू नागपूर केबीएमए असा मजकूर लिहिलेला कागदही पोलिसांना सापडला.
मात्र, पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर त्याचा बनाव उघड झाला. त्यानंतर पोलिसांनी बॉम्बशोधक पथकाला बोलावून बॅगमधील स्फोटकसदृश वस्तूची तपासणी केली. त्यानंतर पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. नंदनवन पोलिसांनी लगेच बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केले गेले. पथकाने रात्री उशिरा त्यात कमी प्रतीचे स्फोटक ( गावठी बॉम्ब सदृश ) असल्याचे सांगितले. नंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत झाली आहे.