जव्हार येथील युवकाचे धक्कादायक कृत्य
टीम : ईगल आय मीडिया
त्याने आपले फेसबुक ” live ” सुरू केले आणि बघता – बघता छताच्या पंख्याला स्वतःला लटकवून आपले ” life ” बंद केले. हा सगळा थरार live अनेकांनी पाहिला मात्र त्यांच्यापर्यंत कुणी पोहोचण्यापूर्वीच तो दूरवर गेला होता. जव्हार शहरातील या live आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे.
जव्हार शहरातील राममंदिरा शेजारील इमारतीत राहणाऱ्या २२ वर्षीय युवकाने फेसबुक live सुरू ठेवून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. काल गुरूवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
वाडा तालुक्यातील वीरा येथील नवनाथ बोगे ( वय २२ वर्षे ) हा तरुण जव्हार येथील हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता. त्याच हॉटेल मालकाच्या फ्लॅटमध्ये तो रहात होता. गुरूवारी संध्याकाळी पंख्याला लटकवून घेत त्याने आत्महत्या केली. यावेळी त्यानं आपल्या आत्महत्येचं फेसबुक लाईव्ह केलं. आणि आपलं life संपवले.
यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे live आत्महत्या झालेल्या आहेत, त्या पाहूनच या युवकाने हा मार्ग स्वीकारला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.