टीम : ईगल आय मिडिया
प्रसिद्ध हिंदी गीतकार आणि पटकथाकार जावेद अख्तर यान यंदाचा प्रतिष्ठित रिचर्ड डॉवकीन्स पुरस्कार जाहीर झाला आहे. यापुरस्कार प्राप्तीबद्दल जावेद अख्तर यांचे त्यांच्या चाहत्यांसह सेलिब्रिटीनीसुद्धा अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळवणारे जावेद अख्तर हे पहिलेच भारतीय आहेत.
इंग्लंडमधील जीवशास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स यांच्या स्मरणार्थ धर्मनिरपेक्षता , मानवी मूल्यांची जपणूक आणि समाजाच्या विकासात योगदान देणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार २००३ सालापासून दिला जातो . मागील वर्षी हा पुरस्कार अमेरिकन विनोदी अभिनेता रिकी ग्रेव्हिन्स याना दिला होता.
७५ वर्षीय गीतकार जावेद अखतर यांनी आपल्या अनेक गीत रचनांमधून मानवी मूल्यांची जपणूक करणारा, हिंसा, धार्मिक, प्रादेशिक व्देष या विरोधात संदेश दिला आहे. त्यामुळे अख्तर याना पुरस्कार जाहीर होताच अभिनेता अनिलकपूर , फरहान अख्तर ,शबाना आझमी यांच्यासह विविध मान्यवरांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे .