जया बच्चन निगेटिव्ह : अनुपम खेर च्या आईसह भाऊ कोरोनाग्रस्त
मुंबई : ईगल आय मीडिया
बॉलिवूड ला धक्का देणाऱ्या अमिताभ, अभिषेक यांच्या कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट नंतर रविवारी आणखी धक्के बसले आहेत.
यामध्ये सर्वात मोठा धक्का ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्या सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत. अमिताभ आनि अभिषेक शनिवारी रात्रीच पॉझिटिव्ह आले आहेत तर रविवारी अभिषेक ची अभिनेत्री पत्नी ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्या यांचेही रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. तर जया बच्चन यांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे.
दरम्यान, अभिनेता अनुपम खेर यांच्या मातोश्री आणि भाऊ राजू खेर हे सुद्धा कोरोना पॉजीटीव्ह आले आहेत. त्यामुळे रविवारी बॉलिवूड मोठा धक्कादायक दिवस ठरला आहे.
अभिषेक बच्चन याचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून ऐश्वर्या आणि जया बच्चन यांचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले आहेत. अभिषेक बच्चन यालाही रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या तरी अमिताभ यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची आवश्यकता नाही असे डॉक्टरांनी सांगितले आहे.