मराठी चित्रपट ” फांजर’’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पहिला टिझर आज युट्युबवर होणार प्रदर्शित !

सांगोला : ईगल आय मीडिया

‘फांजर’ या मराठी चित्रपटाचा टिझर युट्युबवरील nirzarasrushti films या चॅनलवर आज 2 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता प्रदर्शित होणार आहे. या ऑनलाईन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी 4.55 वाजता युट्युबवर ऑनलाईन उपस्थित राहण्याची विनंती चित्रपट लेखक, दिग्दर्शक, निर्माते देवदत्त धांडोरे यांनी केली आहे.
‘फांजर’ या चित्रपटात सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांचा उत्तम असा अभिनय पहावयास मिळणार आहे. या चित्रपटाचे संगीतकार पी.शंकरम यांच्या सुरेल संगीताची जादू मनाला मोहित करणार आहे. चित्रपटाचे निर्माते देवदत्त धांडोरे, विलास चंदनशिवे हे आहेत. सहाय्यक दिग्दर्शक फय्याज अहमद, हर्षद बनसोडे,कॅमेरामन फय्याज अहमद यांनी सुंदर चित्रीकरण केले आहे.  महाराष्ट्राबाहेरही या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे.
या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. आज2 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता ऑनलाईन टिझर प्रदर्शित अनावरण सोहळ्याला सर्वांनी युट्युबवरीलnirzarasrushti films या चॅनलवरील 4.55 वाजता ऑनलाईन होणार असल्याचे परिवर्तन परिषदेचे अध्यक्ष प्रा.विधीन कांबळे यांनी केले आहे.
 

आधुनिक युगातील प्रेक्षक वर्गाचा विचार करून ‘फांजर’या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात अविस्मरणीय लव्हस्टोरी, अ‍ॅक्शन थरार, जबरदस्त कॉमेडी, सस्पेन्सचा थ्रिलर धम्माल पॅकेज चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करेल याची मला खात्री आहे. जनतेने प्रेमरूपी आशिर्वाद, शुभेच्छा, प्रेरणा देण्यासाठी nirzarasrushti films या युट्युब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर व कमेंट करायला विसरू नका ही विनंती.
– देवदत्त धांडोरे ( लेखक, दिग्दर्शक निर्माते)

Leave a Reply

error: Content is protected !!