अभिनेते रजनीकांत हॉस्पिटलमध्ये दाखल

चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान 4 सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आले होते

टीम : ईगल आय मीडिया

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून  रुग्णालयाकडून अधिकृतरित्या ही माहिती देण्यात आलीय. रजनीकांत बरे व्हावेत म्हणून चाहत्यांनी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे.

यापूर्वी, रजनीकांत यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्रक्रिया पार पडली होती. ऑक्टोबर महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रजनीकांत यांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचं डॉक्टरांना आढळळं होतं. त्यामुळे डॉक्टरांकडून त्यांना करोना काळात बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला होता.

रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ या आगामी चित्रपटाचं शूटिंग हैदराबादमध्ये सुरू होतं. टीममधील चार सदस्यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं समजल्यानंतर चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर रजनीकांत यांनी चेन्नईतील आपल्या फार्महाऊसमध्ये आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला होता.

मंगळवारी त्यांच्या करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. परंतु, त्यांच्या रक्तदाबात मात्र चढ-उतार दिसून आल्यानं त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. रक्तदाब सामान्य झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल.

Leave a Reply

error: Content is protected !!