जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

ईगल आय न्यूज : विशेष प्रतिनिधी
हिंदी आणि मराठी सिनेमातील जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे शनिवारी उपचारादरम्यान निधन झाले. रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्र‌वाणी मालिका अशा सर्वच माध्यमांतून आपल्या अभिनय कर्तृत्वाचा ठसा उमटवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले (वय ७७) यांचे प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. सीमेवर लढणाऱ्या जवानांना अर्थसाह्य करण्याबरोबरच रोखठोक भूमिका घेणारे पारदर्शी व्यक्तिमत्त्व असा सामाजिक भान जपणारा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्यामागे पत्नी वृषाली आणि कन्या असा परिवार आहे.


सिनेमा मराठी असो की हिंदी कोणत्याही भूमिकेत विक्रम गोखले यांनी कधीच निराश केले नाही. वाट्याला आलेलं कॅरॅक्टर ते अगदी सहजपणे जिवंत करायचे. त्यांच्या दिसण्यात, आवाजात एक रुबाब होता. अलीकडच्या काळात नटसम्राट या सिनेमात त्यांचा सर्वोत्कृष्ट अभिनय बघायला मिळाला. नाना पाटेकर समोर त्याच नेटाने ते उभे राहिले आहेत. त्या दोघांची जुगलबंदी हाच सिनेमाचा जीव आहे. त्यांच्यातील खोडकर, खेळकर दोस्ती अखेरच्या टप्प्यात अनेक प्रसंगी डोळ्यात पाणी उभा करते. अग्निपथ मध्ये अमिताभ समोर ते नवखे वाटले, तरीही त्यांनी तीसुद्धा भूमिका अप्रतिम साकारली आहे. माहेरची साडी तर मराठीतील शोलेच ठरला आहे.

अभिनेते म्हणून ते अद्वितीय होते. मात्र अलीकडच्या काळात त्यांनी केलेली वक्तव्ये त्यांच्या विषयी मनात कटुता निर्माण करून गेली. शेवटी माणूस च तेही, परिपूर्ण कुणीही नसतो. मृत्यूसोबत ती कटुता ही गेली. विक्रम गोखले कलाकार म्हणून कायम अविस्मरणीय आहेत.

विक्रम गोखले यांचे मराठी चित्रपट
मॅरेथॉन जिंदगी, आघात,आधारस्तंभ,आम्ही बोलतो मराठी,कळत नकळत,,ज्योतिबाचा नवस,,दरोडेखोर,दुसरी गोष्ट,दे दणादण,नटसम्राट,भिंगरी,महानंदा,माहेरची साडी,लपंडाव,वजीर,वऱ्हाडी आणि वाजंत्री,वासुदेव बळवंत फडके,सिद्धांत,मुक्ता,वजीर,
विक्रम गोखले यांचे हिंदी चित्रपट
अकेला,अग्निपथ,अधर्म,आंदोलन,इन्साफ,ईश्वर,कैद में है बुलबुल,क्रोध,खुदा गवाह,घर आया मेरा परदेसी,चँपियन,जख़मों का हिसाब,जज़बात,जय बाबा अमरनाथ,तडीपार,तुम बिन,थोडासा रूमानी हो जाय,धरम संकट,परवाना,प्रेमबंधन,फलक द स्काय,बदमाश,बलवान,यही है जिंदगी,याद रखेगी दुनिया,लाईफ पार्टनर,लाड़ला,श्याम घनश्याम,सती नाग कन्या,सलीम लंगडे पे मत रो,स्वर्ग नरक,हम दिल दे चुके सनम,हसते हसते,हे राम


याशिवाय विक्रम गोखले यांनी २० हुन अधिक हिंदी आणि मराठी नाटकामध्ये भूमिका केल्या आहेत. त्यांच्या निधनाने सिनेमा जगताने एक महान कलाकार गमावला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!