यु ट्यूबवर ‘टॉप ट्रेंडिंग’ असतानाच १० लाखांवर ” dislike “
टीम : ईगल आय मीडिया
१९९२ साली आलेल्या ‘ सडक ‘ या गाजलेल्या हिंदी चित्रपटाचा रिमेक ‘ सडक २ ‘येत आहे. या चित्रपटाची चर्चा सुरु असून मंगळवारीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
या ट्रेलरने यु ट्यूबवर टॉप ट्रेंडिंग मिळवले आहे, १ दिवसात २१ लाख प्रेक्षकांनी ट्रेलर पाहिला मात्र त्याचवेळी ट्रेलर बाबत प्रेक्षकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. २१ लाख लोकांनी ट्रेलर पाहिला त्यापैकी तब्बल १० लाख लोकांनी trailer आवडला नाही असे disslike चे बटन दाबले आहे आणि केवळ ८३ हजार लोकांनी लाईक केले आहे. १ लाखाहून अधिक कॉमेंट्स आहेत आणि त्यातील ९० टक्के कॉमेंट्स नाकारात्कमक आहेत. त्यामुळे या चित्रपटाचं काय होणार असा प्रश्न हॉटस्टार या वितरक कंपनीला पडला असावा.
चित्रपट २८ ऑगस्ट रोजी डिस्ने हॉटस्टार वर प्रदर्शित होत आहे. चित्रपटात संजय दत्त, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर प्रमुख भूमिकेत आहेत आणि २१ वर्षांनी कम बॅक केलेल्या महेश भट्ट यांचे दिगदर्शन आहे. सडक १ सुद्धा त्यांनीच दिगदर्शित केला होता. त्यातही संजय दत्त आणि जोडीला पूजा भट्ट होती.अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड सह पब्लिकमध्येही घराणेशाही विरोधात ट्रेंड सुरु झाला असून भट्ट कॅम्प सुद्धा घराणेशाहीबाबत टीकेच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळेच सडक २ वर बहिष्कार टाका असा ट्रेंड चालू झाला आहे. त्याचाच परिपाक म्हणून तब्बल ५० टक्के एवढ्या विक्रमी Dislike मिळालेले आहेत. आणि ट्रेलरवर टीका होत आहे.