टीम : ईगल आय मीडिया
१९९० च्या दशकात हिंदी चित्रपट जगतात टॉप ला पोहोचलेली अभिनेत्री संगीता बिजलानी आज ( ९ जुलै ) रोजी ६० वर्षांची झाली आहे . २० पेक्षा जास्त सिनेमात अभिनय केलेल्या संगीता बिजलानीने १९९६ साली क्रिकेटपटू महंमद अझरुद्दीन याच्यासोबत लग्न केले. १४ वर्षे संसार केल्यानंतर संगीताने अझरुद्दीनशी घटस्फोट घेतला. ९ जुलै १९६० रोजी मुंबईत जन्मलेल्या संगीता बिजलानीने १९८० साली मिस इंडिया ‘किताब पटकावला होता. १९८८ साली आलेल्या कातिल या सिनेमातून तिने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले.
१९८९ साली सुपरहिट झालेल्या त्रिदेव मुळे तिची लोकप्रियता वाढली. त्यानंतर तिचे खुदगर्ज, हातिमताई, जर्म , गुनाहोंका देवता, विष्णू देवा, पाप कि कमाई , जय शिव शंकर, योद्धा , खून का कर्ज, इन्स्पेकटर धनुष्य, गुन्हेगार कौन, नंबरी आदमी, तहकीकात, युगंधर, इज्जत, लक्ष्मण रेखा, गेम असे चित्रपट गाजले.
अभिनयात सुमार असूनही संगीता बिजलानीने आपल्या भारतीय सादगी लाभलेल्या सौन्दर्याच्या बळावर सुमारे ८ वर्षे फिल्म इंडस्ट्रीत जम बसवला होता. १९९३ च्या दरम्यान तिचे सलमानखान सोबतचे अफेअर चर्चेत आले होते. १९९४ साली सलमान सोबत तिचे लग्न निश्चित झाले होते, लग्न पत्रिकाही छापून झाल्या होत्या अशी चर्चा होती. मात्र कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक मुहूर्ताची वेळ निघून गेली आणि २ वर्षांनी १९९६ साली अगोदरच विवाहित आणि २ मुलांचा बाप असलेल्या अझरुद्दीनशी तिने लग्न केले. हे लग्न १४ वर्षे टिकले २०१० साली अझरुद्दीन आणि संगीत विभक्त झाले.
आज वयाची साठी साजरी करीत असलेली संगीता अजूनही तशीच सुंदर दिसते, तिने अजूनही आपले सौन्दर्य जपले आहे. अजूनही फिल्मी पार्ट्यातील तिचा वावर तिचे ग्लॅमर ओसरले नसल्याचे दाखवतो. आज संगीता बिजलानी साठी पार करताना तिचे सौदर्य तिच्या चाहत्यांना सुखावून जात असेल.