पिराची कुरोली च्या शॉर्ट फिल्मला मिळाला पुरस्कार

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पिराची कुरोली ( ता.पंढरपुर ) येथील निर्माता दिग्दर्शक मारुती नाईकनवरे यांच्या आधार एक बदल या लघुचित्रपटास इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये यश मिळाले असुन या लघुचित्रपटाला औरंगाबाद येथील रोशनी इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचा सिनेमॅटोग्राफर हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

या लघु चित्रपटात सामाजिक संदेश देण्यात आलेला आहे.आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला एखादा आयएएस अधिकारी कशाप्रकारे मदत करू शकतो. हे या लघु चित्रपटात दाखवून दिले आहे.


या लघु चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन आणि प्रोडक्शन पिराची कुरोली (ता.पंढरपूर) येथील मारुती तुकाराम नाईकनवरे यांनी केले आहे या चित्रपटात अंबिका जावीर,रेश्मा नाईकनवरे,नयन लोखंडे, राहुल मस्के,स्वप्नाली तुपसुंदर,बंडू नाईकनवरे,उत्तम साठे यांनी भुमिका केलेल्या आहेत.

या अगोदर लघु चित्रपटास मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल चे दोन पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे आधार एक बदल या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!