सुशांतसिंग राजपूत आणि सारा अली खान यांच्या संबंधावर कंगनाचे ट्विट
टीम : ईगल आय मीडिया
आत्महत्या केलेला अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि सैफ अलीखान – अमृतासिंग यांची मुलगी अभिनेत्री सारा अली खान यांनी चित्रपटाच्या शूटिंगवेळी एकच खोली शेअर केली होती असा खळबळजनक दावा अभिनेत्री कंगना राणावत हिने केला आहे. कंगनाने या संदर्भात एक ट्विट करून स्टार किड्स वर ते बाहेरून आलेल्या कलाकारांना वापरून घेत असल्याचा आरोप केला आहे.
अभिनेत्री कंगना राणावत आपल्या बेधडक बोलण्याबद्दल फेमस आहे. सुशांतसिंग च्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये घराणेशाही आणि स्टार किड्स टार्गेट केले जात आहेत. सारा अलीखान आणि सुशांतसिंग च्या अफेअरवर कंगनाने बिनधास्त ट्विट केले आहे. सुशांत आणि साराने ‘केदारनाथ’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. तसेच या चित्रपटातून साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याच चित्रपटाच्या वेळी सुशांत आणि साराच्या अफेअरच्या रंगल्या होत्या.
कंगनाने सुशांत आणि साराच्या रिलेशनशीपची बातमी शेअर करत, आउटडोर शूटिंगच्या वेळी दोघांनी एकच रुम शेअर केली होती असा दावा केला आहे. तसेच का हे फॅन्सी नेपोटिजम किड्स संवेदनशील आउटसायर्डसला स्वप्न दाखवतात आणि नंतर त्यांना सर्वांसमोर सोडून देतात? असाही प्रश्न उपस्थित केला आहे.
सुशांत आणि साराच्या अफेअरच्या चर्चा सुशांतचा मित्र सॅम्युअल होकिपने केलेल्या पोस्टमुळे पुन्हा सुरु झाल्या होत्या. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मला आजही आठवते केदारनाथ चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी सुशांत आणि सारा एकमेकांच्या प्रेमात होते. त्याच्या ब्रेकअपचे कारण मला आजही समजले नाही. त्यांचा ब्रेकअप बॉलिवूड माफियांच्या दबावामुळे झाला असावा असे म्हटले होते.