उजनी वगळता भीमा खोऱ्यातील सर्व धरणे उपयुक्त पाणी पातळीत ; पुणे शहराच्या ४ धरणात ६ टी एम सी पाणी साठा

पंढरपूर : ईगल आय मीडिया
भीमा नदीच्या खोऱ्यात असलेल्या सर्व धरणांमध्ये १५ जून रोजी उपयुक्त पाणीसाठा आहे. खोऱ्यातील सर्वात मोठे असलेल्या उजनी धरणात मात्र नेहमीप्रमाणेच उणे २४ टक्के इतका पाणी साथ आहे. उर्वरित २४ धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप समाधानकारक पाणी साठा आहे.
गेल्या ३ वर्षात पाऊस लांबत गेल्याने भीमा नदीच्या खोऱ्यात पाणी -बाणी ची परिस्थिती निर्माण होत होती. मात्र गेल्यावर्षी परतीच्या पावसाचा मुक्काम लांबला आणि त्यामुळे पाणी वापरही नियंत्रित झाला. शिवाय यंदाच्या वर्षी जूनच्या पहिल्याच आठवडय़ात झालेला वादळी पाऊस यामुळे शेतीच्या पाण्याची मागणी कमी झाली आहे.

यंदा पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये मिळून १५ जून रोजी तब्बल सहा दलघमी पाणीसाठा आहे. तसेच उजनी वगळता इतर २४ धरणांमध्ये सरासरी २० टक्के इतका पाणीसाठा आहे असे दिसून येते. साधारणपणे मोसमी पाऊस सक्रिय होताना धरणांमध्ये एवढा पाणीसाठा नसतो, असे निरीक्षण जलसंपदा विभागाने नोंदवले आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीपर्यंत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत होता. त्यामुळे जलसंपदा विभागाला यंदा शहरी आणि ग्रामीण भागाला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करता आला. तसेच निसर्ग चक्रीवादळामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार वादळी पाऊस झाला. त्यामुळेही जूनच्या पहिल्याच आठवडय़ात धरणांमधील पाणीसाठय़ात वाढ झाली.
गेल्या वर्षी लांबलेला पाऊस आणि यंदा जूनच्या पहिल्याच आठवडय़ात झालेल्या दमदार पावसामुळे चारही धरणांमध्ये सहा टीएमसी पाणीसाठा आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

error: Content is protected !!